Admission Process

प्रवेश सूचना शैक्षणिक वर्ष २०२२-२३
कला शाखा प्रथम वर्ष बी. ए. (F.Y.B.A.)
वाणिज्य शाखा प्रथम वर्ष बी.कॉम. (F.Y.B.COM.)
विज्ञान शाखा प्रथम वर्ष बी. एस्सी. (F.Y.B.Sc.)
बी. व्होक. १) बी.व्होक. रिटेल मॅनेजमेन्ट (B.Voc. Retail Management) २) बी.व्होक. ऑटोमोबाईल टेक्नोलॉजी, (B.Voc. Auto.Tech.) ३) बी.व्होक. फूड प्रोसेसिंग टेक्नोलॉजी (B.Voc.Food Pro.Tech.) ४) बी.व्होक. फिल्म आर्टस् (B.Voc. Film Art)
प्रथम वर्ष पदविकेसाठी मेरीट फॉर्म भरण्यासाठीची सूचना
  • 1) इ.१२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे नियमास अधीन राहून गुणवत्तेनुसार व राखीव जागांचे नियमानुसार प्रवेश दिले जातील.
  • 2) प्रथम वर्ष पदवी वर्गाच्या सर्व अभ्यासक्रमांना प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या https://hmtcampus360.net/mgvs/OnlineAdmissionसंकेतस्थळावर अॅडमिशन लिंकवर प्रवेश फॉर्म भरावा. सदर प्रवेश संकेतस्थळावरील दिलेल्या माहितीचा फॉर्म भरण्यासाठी उपयोग करावा.
  • 3) या महाविद्यालयात प्रथम वर्ष पदवी वर्गाच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रथम वरील वेबसाईट वर जाऊन आपला प्रवेश अर्ज हाच मेरीट अर्ज समजण्यात येवून त्यानुसार आपल्या प्रवेशासाठीच्या मेरीट याद्या यथाअवकाश याच संकेतस्थळावर दि.३०/०६/२०२२ नंतर प्रसिद्ध करण्यात येतील.
  • 4) ऑनलाईन प्रवेश फॉर्म / मेरीट फॉर्म भरण्याचा कालावधी : दि. १०/०६/२०२२ ते ३०/०६/२०२२
सूचना
  • १) गुणवत्ता यादीत असलेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश घेणे आवश्यक आहे. नंतर आलेल्या विद्यार्थ्याचा प्रवेशावर हक्क राहणार नाही.
  • २) फॉर्म सोबत इ. १२ वी चे मिळालेले ऑनलाईन / मूळ गुणपत्रक व जातीचा दाखला अपलोड करावा.
  • 3) महाविद्यालयाकडून प्रवेशास ऑनलाईन Approval मिळाल्यानंतर विद्यार्थ्याने ऑफलाईन फी भरावी.
  • 4) गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश फी भरून प्रवेश निश्चित करतेसमयी मूळ कागदपत्र (Original L.C., गुणपत्रकाच्या दोन स्वयं साक्षांकित प्रती, जातीचा दाखला, आधार कार्ड, शिक्षणात खंड असेल तर गॅप सर्टिफिकेट) महाविद्यालयात जमा करावेत. ज्यांचे मूळ कागदपत्र दिलेल्या मुदतीत जमा होणार नाहीत त्यांचे प्रवेश कोणत्याही सूचनेशिवाय रद्द केले जातील.
  • 5) वरील मूळ कागदपत्रांचे फोटो आपल्या मोबाईल मध्ये जतन करून ठेवावे. सदर फोटो हे शिष्यवृत्ती साठी आवश्यक आहेत.